Posts

Showing posts from January, 2022

अणू शक्तीमान

Image
  शक्तिमान अणू      अणू म्हणजे काय हे सोप्या  व रंजक भाषेत आणि चित्ररुपातून समजावून सांगितलंय विज्ञान अभ्यासक संजय पाठक यांनी , नुकत्याच प्रकाशित झालेल्या त्यांच्या 'शक्तिमान अणू' या पुस्तिकेतून.    मुलांसह सर्वांनाच अणूविषयी  कमालीचं कुतूहल वाटत असतं. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन लेखक संजय पाठक यांनी 'शक्तिमान अणू ' ही पुस्तिका अनुवादित स्वरूपात लिहिली आहे.अणूची रचना सोप्या इंग्रजी भाषेतून स्पष्ट करणारी एक चित्रमय पुस्तिका भारत सरकारच्या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या पर्यावरण आणि जनसंपर्क संचालनालयाने काही वर्षांपूर्वी प्रकाशित केली होती.न्यूक्लिअर पाॅवर कार्पोरेशनच्या त्या पुस्तिकेचं अनुवादित रूप म्हणजे संजय पाठक यांची 'शक्तिमान अणू' ही पुस्तिका होय.          अणूविषयी सर्वांनाच कुतूहल असतं.अणू हा मूलद्रव्याचा घटक आहे.ॲटोमोस या ग्रीक भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'अविभाज्य '. ॲटोमोसपासून बनला ॲटम हा शब्द. ॲटम म्हणजेच अणू.  अणूच्या अंतरंगात जाण्यापूर्वी लेखक आपल्याला अणूच्या शोधाविषयीची माहिती थोडक्यात सांगतात.इस...